*पवित्र पोर्टल शिक्षक भरती *

 28-Mar-2019,Thursday, 01:43:32

पवित्र पोर्टल शिक्षक भरती  अखेर ची तारीख दि. १०/०७/२०१९  

*पवित्र पोर्टल शिक्षक भरती सूचना:-*

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचनाउमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना 

ज्या उमेदवारांनी Dy. Director Education कार्यालयांअंतर्गत पवित्र मदत केंद्रावर जाऊन दि. २८/०६/२०१९ अखेर पर्यंत नोंद केली आहे परंतु अशा उमेदवारांचे Form यापूर्वी self Certified असतानाही काही तांत्रिक कारणांमुळे अद्यापपर्यंत त्यांना LOGIN करता आले नाही व तत्सम कारणांमुळे Lock करता आलेले नाही. अशा उमेदवारांना दि. ०८/०७/२०१९ व दि. ०९/०७/२०१९ या कालावधीत त्यांच्या लॉगिन वर सुविधा देण्यात येत आहे त्यांनी उक्त कालावधीत लॉगिन करून मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय हे दोन्हीही प्रकारचे प्राधान्यक्रम Generate करून Download करावेत. दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम Download केल्यानंतर Assign,Confirm Lock करण्याची कार्यवाही करावी. लॉगिन करताना Mismatch Password असा संदेश येत असल्यास Forget Password वर क्लिक करून नवीन पासवर्ड तयार करून लॉगिन करून प्रक्रिया पूर्ण करावी. 

ज्या उमेदवारांना दि. ०८/०७/२०१९ व दि. ०९/०७/२०१९ या कालावधीत त्यांचे Form यापूर्वी self Certified असतानाही त्यांना लॉगीन होणार नाही फक्त अशाच उमेदवारांनी त्यांच्याकडील self Certified च्या प्रतीसह एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर पुणे येथे दि. १०/०७/२०१९ रोजी दुपारी १२.०० वाजता स्व:त उपस्थित रहावे. 

वरील उमेदवारांना आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सुविधा देण्यात आलेली आहे. शिक्षक निवड प्रक्रियेचे काम स्वत्रंत्रपणे सुरु आहे त्यामध्ये कोणताही विलंब होणार नाही याची इतर उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

उमेदवारास पूर्वीचा मोबाईल क्रमांक बदल करावयाचा असल्यास त्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हास्तर यांचेकडे जाऊन त्यांना उमेदवार असल्याचा पुरावा दाखवून मोबाईल क्रमांक बदल करून घेता येईल. शिक्षणाधिकारी यांना त्यांचे लॉगिन करून APPLICANT DETAILS या टॅब मध्ये जाऊन CHANGE IN MOBILE मध्ये उमेदवाराचा नवीन मोबाईल क्रमांक बदल करून देता येईल . यासाठी ONLINE REQUEST पाठविण्याची आवश्यकता नाही. उमेदवारांनी स्वतः जाऊन मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावा. शिक्षणाधिकारी यांनी पवित्र मदत कक्षातील रजिस्टर मध्ये नोंद करावी. 

उमेदवारांनी वारंवार विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर FAQ च्या माध्यमातून अद्ययावत करण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी FAQ वर CLICK करून पहावेत. 

पवित्र प्रणाली अंतर्गत पद भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या अद्यावत सूचना उमेदवारांना Applicant Role निवडल्यानंतर येणाऱ्या Page वर Instructions For Applicant या tab वर नव्याने उपलब्ध करून दिल्या जातील. उमेदवारांनी सदर सूचनांचे प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचन करावे. 

उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी मार्गदर्शक Video लिंक, खालील लिंकवर उपलब्ध करून दिली आहे. 

दिनांक २०/०६/२०१९ पर्यंत उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातीचा अभ्यास करावा. 

उमेदवांसाठी सूचना (Instructions For Applicant ) व शासन निर्णय (Pavitra GR s ) अद्यावत करून पोर्टल वर उपलब्ध करण्यात आलेले आहेत . 

प्राधान्यक्रम Generate किंवा Download करणे हि सुविधा दिनांक २५/०६/२०१९ ते ३०/०६/२०१९ या कालावधीत सुद्धा सुरु राहील याची नोंद घ्यावी. 

उमेदवारांनी प्राधान्यक्रम LOCK केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी उमेदवारानी लॉगिन केल्यानंतर Reports या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय साठी View Locked Preferences (Without Interview ) या टॅब वर क्लिक केल्यावर तसेच मुलाखतीसह साठी View Locked Preferences (Without Interview ) या टॅब वर क्लिक केल्यावर प्रिंट घेता येईल. 
:

VR COMPUTER